Views

*श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियान कार्यात तन मन धनाने सहभागी व्हावे,भारतमाता मंदिर समितीचे प्रमुख कार्यकर्ते शंकरजी जाधव*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियान कार्यात तन मन धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतमाता मंदिर समितीचे प्रमुख कार्यकर्ते शंकरजी जाधव यांनी केले. उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील भारतमाता मंदिरात श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी परिसरातील विविध समाज घटकातील कथाकार, भजनी मंडळ, बचतगटाच्या महिला, रामभक्त, कारसेवक, यांच्या हस्ते भारतमातेच्या व भगवान श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते शंकरजी जाधव यांनी श्रीराम मंदिर इतिहास व निधी समर्पण अभियाना बद्दल विस्तृत माहिती देवुन ते म्हणाले की "सभ समाज को लिए साथ मे मंदिर भव्य बनाना है" संत महंतांच्या अवाहनाने राममंदिर हे राष्ट्र मंदिर होण्यासाठी आपण तन मन धनाने सहभागी होऊन आपला खारीचा वाटा समर्पित करावा, असे अवाहन केले. या वेळी उपस्थित संयोजक गोपाळराव डोणगावे (गुरुजी) सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पाटील, कथाकार विठ्ठल बिराजदार, प्रवचनकार बाबुराव पाटील, लोहारा अभियानाचे ता.कार्यकर्ते मनोज तिगाडे सेवावर्धनी संस्थेचे अनिलकुमार राठोड, धनाजी पाटील, दत्तात्रय बिराजदार, हरिदास कल्याणकर, किसन कुलकर्णी, प्रभाकर घोटमाळे, श्रीशैल्य जेळेकोरे, पल्लवी डोणगावे, नागराबाई कांबळे, इंदुबाई सरवदे, किसाबाई डोणगावे, ललिता डोणगावे, यांच्यासह कारसेवक, रामभक्त महिला, बाल, गोपाळ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अभार गोपाळराव डोणगावे (गुरुजी) यांनी केले.

 
Top