Views


*श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र निधी समर्पण अभियाना अंतर्गत तोरंबा गावातून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात राम दिंडी* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र निधी समर्पण अभियाना अंतर्गत लोहारा तालुक्यातील तोरंबा गावातून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात राम दिंडी काढण्यात आली. या दिंडी चे स्वागत करण्यासाठी महिला भगिनीनी रस्ताची स्वछता करून, सडा, रांगोळी काडून प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी ह.भ.प. रामकृष्ण महाराज तोरंबेकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. राम हे सर्व भारतीयांचे आदर्श जात पात पंथ भेद विसरून राम कार्य करावे असे आवाहन केले.यावेळी ह.भ.प. माऊली महाराज, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकट नागोराव रणखांब, भारतमाता मंदिराचे प्रमुख शंकर जाधव, अभियानाचे तालुका कार्यकर्ते शहाजी जाधव, दत्तात्रय पोतदार, मनोज तिगाडे, किशोर होणाजे, व्यंकटेश पोतदार, माजी सरपंच मारोती बनसोडे, राजेंद्र काळे, सुधाकर पाटील, तानाजी चव्हाण, सुरेश पाटील, व्यंकट चव्हाण, पिंटू पाटील, शिवाजी चव्हाण, दिलीप माळी, अशोक रणखांब, महादेव बिराजदार, व्यंकट मोरे, हरी बिराजदार, महादु तेली, काशीनाथ कांबळे भाऊराव रणखांब, भाग्यश्री चव्हाण, दमाबाई चव्हाण, छायबाई हिपरगे भारतबाई पाटील, श्रीदेवी बिराजदार, हनुमान पुरुष भजनी मंडळ ,संत मारोती महाराज महिला भजनी मंडळ, नरेंद्र माऊली भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, यांच्यासह गावातील सर्व राम भक्त कारसेवक, बालगोपाल उपस्थित होते.
 
Top