Views


*हराळी येथे विविध सामाजिक उपक्रम घेऊन सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील हराळी येथे विविध सामाजिक उपक्रम घेऊन सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुलांची वेशभूषा स्पर्धा, मुलीच्या जन्माचे स्वागत करून सावित्रीबाई फुले जागर स्त्री शक्तीचा गावातून दिंडी काढण्यात आली. व तसेच कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ते यांचा सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांचा फोटो देऊन अंगणावडी हराळी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी चव्हाण सर व रंजनाताई हासुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पो‌.नि.धर्मसिंग चव्हाण, पर्यवेक्षिका माया जमादार मॅडम, डॉ.संतोष मनाळे, अजित रणखांब सर, जीजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे, पोलीस कर्मचारी पांचाळ, पोलीस पाटील नितीन सोनवणे, बचत गटाच्या संगीता सुर्यवंशी, अंगणवाडी सेविका निर्मला सुर्यवंशी, सुवर्णताई सुर्यवंशी, मदतनीस फराजनबी शेख, उर्मिला कस्तुरे, लक्ष्मी मुगळे, भारत हाके, यांच्यासह विद्यार्थी, मातापालक, गावातील महिला उपस्थित होत्या.
 
Top