Views


*सुत्रय्या स्वामी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मुख्य वैज्ञानिक पदी निवड*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरूम येथील सुत्रय्या रूद्रय्या स्वामी (केसरजवळगेकर) यांची भारत सरकारच्या केंद्रीय जल तथा विद्युत अनुसंधान शाला, खडकवासला, पुणे येथे मुख्य वैज्ञानिक (चीफ सायंटिस्ट) पदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांची ही निवड जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजू मिणियार, संजय मिणियार, सुधीर वेदपाठक, राजशेखर खुने, वाडीकर बंधू, राजू मुदकण्णा, श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, गुंजोटी येथील शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, सिध्दलिंग जवळेकर, प्राचार्य डाॅ.राजशेखर हिरेमठ, डाॅ. शीला स्वामी, धनेश जवळेकर (सोलापूर), डाॅ.राजेश स्वामी, डाॅ. किरण स्वामी (मुंबई), कपिलेश्र्वर स्वामी, स्वामी मंडप (उमरगा), राचोटी स्वामी (लातूर) आदी नातेवाईकांसह मित्र परिवार यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top