Views
*भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने विविध संस्था व आत्मनिर्भर व्यक्तींचा सन्मान*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्तीचा राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रतिष्ठान भवन येथे भारतीय जनता युवा मोर्चा पार्टी यांच्या वतीने विविध संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे होते तर प्रमुख म्हणून बुद्धिजिवी प्रकोष्ट संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड.अनिल काळे, संयोजक अरुण पाठक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरीताई गरड, नगरसेवक युवराज नळे, प्रशांत गुरव व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, आदि, उपस्थित होते. युवकांनी जिजाऊचे संस्कार लक्षात घेऊन स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा सदैव चांगल्या कार्याचा पाठीशी राहील अशी ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली. चांगल्या कामात अनंत अडचणी उभ्या राहत असतात पण अशा अडचणींवर मात करत संस्था व व्यक्तीनी उभे केलेले काम कौतुकास्पद आहे असे ही मत नितीन काळे यांनी व्यक्त केले. युवा मोर्चा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज विविध उपक्रमांनी आजची जयंती साजरी करण्यात येत असून युवा मोर्चा युवकांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहून भविष्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती संयोजक अरुण पाठक यांनी दिली. युवा मोर्चा यांनी अतिशय कौतुकास्पद उपक्रम राबविला असून संस्था व व्यक्ती चांगल्या कामासाठी पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम आज युवा मोर्चा यांनी केले आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रशांत गुरव यांनी स्वामी विवेकानंद व वसुंधरा गुरव यांनी जिजाऊ यांच्या विषयी विचार व्यक्त केले. यावेळी जनकल्याण समिती धाराशिव, अन्नपूर्ण ग्रुप उस्मानाबाद, एकता फाउंडेशन उस्मानाबाद, संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद , युवा ग्रुप मराठी माणूस उस्मानाबाद, लोकमान्य टिळक गणेश मंडळ उस्मानाबाद, युनिटी फाउंडेशन उस्मानाबाद, खैर फाउंडेशन उस्मानाबाद या संस्थांचा व चंद्रकांत जाधव, शहाजी चव्हाण, पौर्णिमा खरमाटे, निकिता पवार, जयराज खोचरे, प्रवीण माळी, प्रफुल्ल पांचाळ, रोहित मस्के, खंडु राऊत,अनिरुद्ध जोशी, डाँ.सागर खोत व केतन पुरी या व्यक्तींचा सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदना करुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात राजसिंह राजेनिंबाळकर यांनी कार्यक्रम आयोजना मागची भूमिका व्यक्त करत आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिह पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनखाली हा कार्यक्रम आयोजन केला असल्याचे सांगत सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांचे मनापासून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी आनंद कंदले, विनोद निंबाळकर, महेश पवार, अमोल राजे निंबाळकर, अमित कदम, बालाजी मडके, मंगेश तिवारी, अभिराम पाटील, गिरीष पानसरे, सुनिल पगुडवाले , दाजी आप्पा पवार, सचिन लोढे, सुजित साळुंके, कुलदीप भोसले, राज निकम, विशाल पाटील, प्रतिम मुंडे, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, पुजा राठोड, दादुस गुंड, अक्षय भालेराव, अक्षय व्यास, आमित साळुंके, प्रविण वाघमारे आदीची उपस्थिती होती.
 
Top