Views
*राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद जयंती साजरी करुन केली वेळ अमवस्या*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

राष्ट्र माता राजमाता माँ जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती व त्याच सोबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनची वेळ अमावस्या याचे औचित्य साधुन शेतात पांडव पुजना सोबत माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून आंबील, हुंड्याचा नैवद आणि " हर हर महादेव "च्या गजरांनी लोहारा तालुक्यातील नागपुर येथील समाजीक कार्यकर्ते यशवंत चंदनशिवे यांच्या नागुर शेतात अनोखी वेळ अमवस्या साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पुजन रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे संघटक शंकरजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाना सलगरे, बब्रुवान जावळे, बाबुराव पोतदार (गुरुजी ), रवी चव्हाण, व्यंकटेश पोतदार, बालाजी जाधव, सौ.सुलक्षणा जाधव, सौ.अश्विनी चंदनशिवे, अस्मिता चंदनशिवे, आराध्या चंदनशिवे, मंथन जाधव, आदि उपस्थित होते.
 
Top