Views


*जिजाऊ ब्रिगेडची लोहारा तालुका कार्यकारिणी जाहीर*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सवानिमित जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सुजाताताई चव्हाण, तोरंबा सरपंच वर्षाताई चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे यांच्या उपस्थितीत  
जिजाऊ ब्रिगेडची लोहारा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुका सचिव अनुसया माली, कार्याध्यक्ष पदी प्रतिभा परसे, उपाध्यक्ष पदी शुभांगी चव्हाण व गोकर्णा कदम, कोषाध्यक्ष पदी मेघा जाधव, संघटक पदी बालिका मोरे, तर सुनंदाताई रनखांब व बबिता रनखांब यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रथम जिजाऊ सावित्री प्रतिमा पूजन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिजाऊ वंदना अनुसया माळी यांनी घेतली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुजाताताई चव्हाण यांनी शासकीय योजना व महिलांचं अर्थकारण या विषयावर मार्गदर्शन केले. तर जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे यांनी कर्मकांड आणि महिला जीवन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन प्रतिभा परसे यांनी केले. तर गोकर्णा कदम यांनी आभार मानले. लोहारा तालुक्यात जिजाऊ ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधनिस सुरुवात होणार आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हा विचार घेऊन पुढील काळात कार्य करणार असल्याचे मत यावेळी रंजनाताई हासुरे यांनी व्यक्त केले.
 
Top