Views


*कोरोना महामारी च्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 
लोहारा तालुक्यातील पोलीस पाटलांचा लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान*

उस्मानाबाद :-(इकबाल मुल्ला)

कोरोना महामारी च्या काळात लोहारा तालुक्यातील पोलीस पाटलांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने दि.1 जानेवारी 2021रोजी पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस पाटलांनी कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाला अतिशय मोलाची मदत करत आपल्या गावातील लोकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते यांनी पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांच्याशी चर्चा करून पोलीस पाटील यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलीस पाटील यांच्या कामाची दखल घेऊन उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रोशन राज तिलक यांनी जिल्ह्यातील पोलिस पाटलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला. दि.12डिसेंबर पोलीस पाटील वर्धापन दिनानिमित्ताने पोलीस पाटलांचा सन्मान पत्र देवून गौरविण्याचे नियोजन केले. परंतु जिल्हाभरातील पोलीस पाटील यांची संख्या जास्त असल्याने सन्मान पत्र लोहारा पोलीस ठाण्याकडे पाठवले. दिनांक 1 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात लोहारा पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा जगताप, लोहारा तालुका सचिव संजय नरगाळे, ज्येष्ठ पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, प्रदीप पाटील, राजेंद्र भोजने, तानाजी माटे, निळकंठ कोठावळे, धनराज हावळे, मारुती लोहार, दीपक जाधव, सुखराज पाटील, बिरुदेव सूर्यवंशी, दादासाहेब मूर्टे, बालाजी कदम, बालाजी मातोळे, अमोल गव्हाळे, ईश्वर सुरवसे, मनीषा चाकूरे, यांच्यासह पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
 
Top