Views
*लोहारा शहरात व तालुक्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरात व तालुक्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शहरातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तहसील कार्यालयाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार डॉ.रोहन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, पं.स.उपसभापती व्यंकट कोरे, माजी सरपंच नागण्णा वकील, शंकर जट्टे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, इस्लाईल मुल्ला, बालाजी चव्हाण, यांच्यासह कर्मचारी, अधिकारी, माजी सैनिक, नागरीक उपस्थित होते. पं.स.कार्यालयाचे ध्वजारोहण गटशिक्षण .कार्यालयाच्या प्रांगणात पं.स.सभाती हेमलता रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती व्यंकट कोरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, आदि, उपस्थित होते. तालुका कृषी कार्यालयाचे ध्वजारोहण तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी अधिकारी जे.डी.माळी, कृषि सहाय्यक शैलेश जट्टे, एस‌.टी. चेंडकाळे, कृषी सहायक
ओ.एच.पाटील, विशाल पवार,पिचे,राहुल चेंडके,एम आर जाधव, भोजने, सुरवसे, अदि, उपस्थित होते. पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पो.नि.धरमसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपंचायतचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गजानन शिंदे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक अबुलवफा कादरी, नगरसेवक अभिमान खराडे, दिपक मुळे, नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक आरीफ खाणापुरे, नगरसेविका सिमा सारी लोखंडे, नगरसेविका सुनीता ढगे, नगरसेविका निर्मला स्वामी, नगरसेविका जयश्री कांबळे, नगरनगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक गगन माळवदकर, हरी लोखंडे, आदि, उपस्थित होते. लोकमंगल माऊली इं.लि.साखर कारखाना लोहारा खुर्दचे ध्वजारोहण भारतीय दलाचे माजी अधिकारी श्रीशैल्य येणेगुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर महेश कोनापुरे, असीसंट जनरल मॅनेजर व्यंकटेश वाघोलीकर, चिप केमिस्ट नरेश रामपुरे, सिनीयर इंजिनिअर चनबस्वेशवर तोळनुरे, प्रशासकीय अधिकारी राजकुमार सगर, अमोल हावळे, राम पाटील, किरण पाटील, वसुली अधिकारी निळकंठ जाधव, बसवंत हावळे, अंगद हराळे, किरण पाटील, दिपक कदम, पंकज पाटील, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, उपस्थित होते. शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंकर जाधव, सविता जाधव, पुजा दाळींबकर, शितल खराडे, सिध्देश्वर सुरवसे, हारुण हेडडे, व्यंकटेश पोतदार, अदि, उपस्थित होते. 
लोहारा तालुक्यातील जेवळी(द) येथे सार्वजनिक ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, नितीन दंडगुले, शैलेश नकाशे, अलताफ मुल्ला, चैतन्य कुलकर्णी, राजू पांढरे, सुनिल दंडगुले, किशोर होनाजे, दिपक चौगुले, मोरेश्वर ढोबळे, आप्पु भुसापा, महेश दंडगुले, गोविंद चव्हाण, ओमकार जेवळीकर, बब्रुवान गोंधळी, यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
 
Top