Views


*कोविड - 19 अंतर्गत आरोग्य कर्मचारी यांना कोविशिल्ड लसीकरणाचा लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयात
 शुभारंभ*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कोविड - 19 अंतर्गत आरोग्य कर्मचारी यांना कोविशिल्ड लसीकरणाचा दि.27 जानेवारी 2021 रोजी शुभारंभ लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला.
यावेळी कोविशिल्ड ची पहिली लस अंगणवाडी मदतनीस सौ.उज्वला मोरे यांना देण्यात आली. व तसेच 44 जणांना लस देण्यात आली. यावेळी लोहारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.बाळासाहेब भुजबळ, जिल्हा आशा समनवयक सतिश गिरी, वैध्यकिय अधिकारी डॉ.राजू गायकवाड, डॉ.इरफान शेख, औषध निर्माता मुजावर, खंडू शिंदे, बागवान, इन चार्ज सिस्टर श्रीमती मोरे, स्टाफ नर्स, श्रीमती स्वामी, श्रीमती घोडके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उमकांत दिग्गे, दत्तात्रय वाघे, माधव सिरसाट, आदिनाथ फुलसुंदर, संतोष मस्के, आदी उपस्थित होते.

 
Top