*खरीप हंगाम मधील पीकविमा विना अटीशर्ती सरसकट लागू करण्यात यावा -- जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
खरीप हंगाम मधील पीकविमा विना अटीशर्ती सरसकट लागू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बजाज अलायन्स विमा कंपनीचा अजब कारभार सुरु आहे. उस्मानाबाद जिल्यातील खरीप हंगाम 2020 सालात अतिवृष्ठी मुळे पुर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनचे सोयाबीन, उडिद पिकासह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. परंतु बजाज अलायन्स विमा कंपनी नियमावर बोट ठेऊन काम करताना दिसत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनकडे आँनराईड मोबाईल नाही. त्यानी झालेल्या नुकसानीचे फोटो कसे द्यायचे हा मोठा प्रश्न आहे. एका चँनलवर बातमी बघितली जवळपास 12 हजार शेतकरी विम्यापासून वंचित राहाणार आहेत. इतकं मोठं नुकसान होऊन सुद्धा तुटपुंजी मदत बजाज अलायन्स कंपनी करीत आहे. हे चुकीचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला त्याचे अतोनात नुकसान झाले त्याना जिओ टँग करता आला नाही. सर्वच शेतकरी मोबाईल वापरणारे नाहीत. म्हणून बजाज अलायन्स शेतकऱ्यांवर अन्याय करत असेल तर हे चुकीचे आहे. त्याचबरोबर दि. 14--10--2020 ते 30--10--2020 या कालावधीत सतत पाऊस चालू होता. उभे नुकसान होत असताना सुद्धा आम्हाला पीक काढता येत नव्हते कंपनीने सांगितल्या प्रमाणे नेमके 72 तास धरायचे कधीपासून हा संभ्रम शेतकऱ्यांना होता. म्हणजेच विमा कंपनी शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण करून शेतकऱ्यांशी खेळत आहे. खरीप हंगामातील विमा भरणा केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या विमा हा हक्काचं आहे तो जरूर मिळालाच पाहिजे सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा नाही मिळाल्यास, जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे, प्रतिभा परसे, अनुसया माळी, मुक्ता परसे, आदित्य देशमुख, श्रीकांत हासुरे, अमर घोडके, अदि, उपस्थित होते.