Views


*मजबुत संघटना व भाजपा सरकारचे लोकाभिमुख निर्णय यामुळेच भाजपचे यश -- महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस
चंद्रशेखर बावनकुळे* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

संघटनेच्या बळावरच भारतीय जनता पक्ष मजबुतीने उभा आहे,मजबुत सूत्रबद्ध संघटना व भाजपा सरकारचे लोकाभिमुख निर्णय या बळावर आपल्याला 2024 नाही तर 2047 पर्यंतचा विचार समोर ठेऊन संघटना बांधायची आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस तथा भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. उस्मानाबाद शहरातील प्रतिष्ठाण भवन राजे बाग़ येथे जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख म्हणून महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस तथा भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे, मराठवाडा संघटनमंत्री भाऊरावजी देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुलजी लोणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष नितिनजी काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट प्रदेश सहसंयोजक, लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड.मिलिंद पाटील, 
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,
जि.प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, ॲड.अनिल काळे, ॲड.खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस संताजीराव चालुक्य-पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, अदि उपस्थित होते.  
 या बैठकीत मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानसभा निहाय्य युवा मोर्चाचे किमान 5 पदाधिकारी असे असावेत की, ज्यांनी दिवसातील किमान 2 तास वेळ पक्षकार्याला द्यावे,अशा निवडक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडळात 2000 विशेष सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभारावी, सोशलमीडिया सह सर्व मोर्चाचे पदाधिकारी आघाड्यांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवावा, अशा सुचना केल्या‌. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस राहुल लोणीकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या कामाचा आढावा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सादर केला. व लवकरच पदाधिकाऱ्यांच्यि निवडी करुन येणाऱ्या काळात संघटना मजबुत करुण युवा मोर्चाच्यावतीने जिल्ह्यातील चार हि आमदार, खासदार स्वबळावर निवडणूक लढवुन आणण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले. यावेळी ललिता जाधव, गजानन नलावडे, बालाजी चव्हाण, विनोद निंबाळकर, गणेश इंगळगी, गिरीश पानसरे, सुजित साळुंके, सुरज शेरकर, बंटी मुंडे, विशाल पाटील, संदीप इंगळे, पंकज जाधव, राज निकम, राम चोपदार, आशिष मोरे, कुलदीप भोसले, अमोल राजेनिंबाळकर, स्वप्निल नाईकवाडी, प्रसाद मुंडे, अक्षय व्यास, शरीफ शेख, नानासाहेब डोंगरे, गणेश देशमुख, अभिजित चोफे, बालाजी चव्हाण, बालाजी मडके, अजिंक्य मुंडे, अक्षय जित, दादूस गुंड, धीरज शिंदे, मारुती रोकडे, दिनेश लोहार, अक्षय विंचुरे, ओंकार शेरकर, अभिजित लोके, सागर पारडे, पुरुषोत्तम वाघ, महादेव सालंगे, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्च्याचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top