Views



*मुरुम येथील प्रा.डॉ.महेश मोटे यांना अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डी. लीट पदवी प्रदान*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष यांना मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवी प्रदान करण्यात आली. ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, अमेरिका यांच्याकडून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन मानद डी.लीट पदवी देण्यात आली. प्रा.डॉ.महेश मोटे हे नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम येथे गेल्या २५ वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. ते पीएच.डी.संशोधन मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांनी आठ संदर्भ ग्रंथाचे तर चार स्पर्धा परीक्षेची पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ६० च्या वर विविध नामवंत जर्नलमध्ये संशोधन पेपर प्रकाशित असून त्यांनी दोनशेच्यावर विविध परिषदा, अधिवेशने, चर्चासत्र व कार्यशाळामध्ये सहभाग नोंदवून संशोधन पेपरचे वाचनही केले आहे. त्यांचा एक विदेश अभ्यास द्वाराही पूर्ण झाला आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना 65 च्यावर विविध नामवंत संस्था, संघ व संघटनांकडून विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले  आहे. महेश मोटे यांनी या पुर्वी देखील त्यांच्या हातून विविध समाज उपयोगी कार्य झाले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल अवॉर्डने देखील सन्मानित केले आहे. कल्याण येथील एका शानदार सोहळ्यात सागर इंटरनॅशनल हॉलमध्ये गुरुवार (ता.१०) रोजी सुप्रसिध्द गांधीवादी विचारवंत प्राचार्या डॉ.संगिता नाईक यांच्या हस्ते डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली.  यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते सुदर्शन साबत, मुंबईचे गांधी तत्वज्ञ लक्ष्मण गोले, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक प्रोफेसर डॉ.दिनेश गुप्ता, राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.खंडू माळवे, डॉ.योगेश जोशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ.महेश मोटे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. डी.लीट पदवी मिळाल्याने माझा आत्मविश्वास अजून जास्त वाढला असून मी यापुढे ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून स्वत:ला सामाजिक कार्यात अधिक झोकून देणार आहे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.  श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध संस्था-संघटना व विद्यार्थ्यांनी मोटे सरांचे विशेष अभिनंदन केले व शहरात पेढे वाटून आनंद द्विगुणित केला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोन व सोशल मीडियाच्याद्वारे त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top