Views
*उस्मानाबाद भाजयुमोच्या वतीने श्रीमती ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात आंदोलन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्‍यक्ष जे.पी. नड्डा  यांच्यावर दि.10 डिसेंबर 2020 रोजी प. बंगालमध्ये जिवघेना हल्ला झाला. हा हल्ला तृणमुल कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी केला. प.बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी ह्या अत्यंत सुडबुध्दीने राजकारण करत असून प. बंगाल च्या थोर विचाराना पायमल्ली तुडवून अत्यंत बेफीक्रीपणाने वागत आहेत. मागील कांही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते प.बंगालमध्ये प्रचारासाठी गेले की ममता बॅनर्जी सरकार हे लोकशाही पायदळी तुडवून झुंडशाही, दादागीरी, करुन वातावरण दुषीत करत आहेत. या वृतीचा निषेध म्हणून दि.11 डिसेंबर 2020 रोजी उस्मानाबाद येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या दडपशाही वृत्तीचा तीव्रपणे जाहीर निषेध नोंदविला. यावेळी भाजयुमोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, महेश सालके, अमीत कदम, सुजीत साळुंके, प्रितम मुंडे, सु‍नील पंगुडवाले, सचिन लोंढे, राहुल ‍ शिंदे, सुरज शेरकर, विशाल पाटील, शरिफ शेख, अमोल पेठे, राजेंद्र आडसुळ, ओंकार वायकर, प्रसाद मुंडे, अमोल पवार, यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top