Views


*जन्मापासून अंधत्व आणि घरात आठराविश्र्व दारिद्र्य असलेल्या असलमचे NET- JRF मध्ये नेत्रदीपक यश,
पानशॉप चालकाचा मुलगा नेट मध्ये अंधत्व मधून देशासह महाराष्ट्रात पहिला !* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)  
मनात जिद्द आणी कठीण परीश्रम घेण्याची तयारी असल्यास कोणत्याही यशाला गवसणी घालता येते.याचा प्रत्यय नुकताच युजीसी आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय तर्फे असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये उदगीर जिल्हा लातूर येथील सय्यद असलम हाश्मी यांची उर्दू साहित्य या विषयात ज्युनियर रिसर्च फेलोशीप ( #NET_JRF ) साठी  निवड झाली आहे. त्यांना Ph.D करण्यासाठी आणि संशोधन कार्य करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे पुढील पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. संपूर्ण भारतातून उर्दू विषयात केवळ ५० विद्यार्थ्यांना JRF - scholarship प्राप्त झाली आहे . त्यात महाराष्ट्रातील हाशमी सय्यद असलम सय्यद अक्रम सुद्धा आहे ही अभिमानाची गोष्ट. पण हे यश एवढ्या सहजा सहजी मिळालेले नाही. जन्मापासून केवळ पंचेवीस टक्के ( २५%) दृष्टी ( अंध ), घरात अठराविश्र्व दारिद्र्य , इतर दोन्ही भाऊ जन्मापासून अंध, सय्यद अक्रम वडिलांच्या २५-३० वर्षापासून पान शॉप वर सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह. अश्या एक ना अनेक संकटांवर मात करत असलम याने मिळवलेले हे यश निश्चितच नेत्रदीप असेच आहे. घरची परिस्थिती बेताची असताना कुठलीही शिकवणी न लावता नेट मध्ये ३०० पैकी १९६ गुण पटकावून हाशमी सय्यद अस्लम सय्यद अक्रम हा संपूर्ण भारतातून अंधत्वतून पहिला येत. उर्दू साहित्य या विषयात ज्युनियर रिसर्च फेलोशीप नेट-जीआरएफ साठी पात्र ठरला आहे. त्याचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. हाशमी सय्यद असलम चे वडील सय्यद अक्रम हे नगरपरिषद संकुलात एक छोटेसे पानशॉप चालवतात. आईचे सय्यद आशिया चे ही शिक्षणही जेमतेम आहे. मात्र दोघांनाही आपल्या मुलांनी खूप शिकावे यासाठी धडपडत आहेत. त्यांना ४ मुले, १ मुलगी आहे. त्यांचा दुसरा मुलगा एमए इंग्लिश,डीएड, बीएड, बीकॉम, एमकॉम, उर्दू भाषेत पदव्युत्तर, तिसरा मुलगा बीकॉम, एमकॉम पदव्युत्तर शिक्षण घेवून उर्दूत पुराण शिकवितात. तर चौथी मुलगी बी.ए.एम.एस.वैधकीय शिक्षण सांगली येथे घेत आहे. विशेष म्हणजे घरात आठराविश्र्व द्रारिद्ये असतानाही महाराष्ट्र शासनाच्या शासकिय अनुदानावर निशुल्क मोफत पवित्र मकामदिनाची दीड महिना हज यात्रेत सपत्निक सेवा केली. सेट नेट निकालात उर्दू विषयात पहिला सय्यद अक्रम यांच्या कुटुंबातील चार मुले, एक मुलगी तथा हाश्मी सय्यद असलमची तीन भावंडास अनुवंशिक दृष्टिदोष आहे. त्यांना अगदी अस्पष्ट आणि अंधुक दिसेल इतकी दृष्टी ...! महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.माधवी महाके म्हणाल्या की, ज्यावर सध्या तरी कोणताही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत परिक्षा असली की त्यांच्या इयत्ते पेक्षा लहान असलेल्या लेखनिकाची चौकशी करत ते नेहमी विभागात येत. जिद्दीने सय्यद अक्रम यांची तीनही मुले भाऊ-बहीण भावंडानी पदवी, पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले हे करताना सय्यद असलम सय्यद अक्रम नेट सेट परीक्षेत संपूर्ण भारतातून व महाराष्ट्रात अंधत्वतून पहिला आला आहे. तसेच पाचवी कन्या बी.ए.एम.एस. परीक्षेचे या दोन्ही तिन्ही-चारही बहीण-भावंडांची पदवी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. हे करताना त्यांनी एकही तास कधी चुकवला नाही. लेक्चरच्या पाच मिनिट आधी सुरुवातीला चाचपत आणि नंतर सराईतपणे क्लासरूम बाहेर येऊन उभे राहत, मन लावून सगळे तास अटेंड करत केवळ डोळ्याजवळ नेवून काही अंधुक दिसणारी अक्षरे, लेक्चर्स, ऑडियो नोट्स ऐकून या मुलांनी सर्व परीक्षा दिल्या. कधीही बेशिस्त नाही. गडबड नाही अथवा आपल्या परिस्थितीच अवडंबर नाही,  महाविद्यालयात अगदी रस्त्याच्या कडेन शांतपणे जाताना-येताना या भावंडाचे कौतुक वाटे...!  परिस्थिती पुढे हतबल होवून  नैराश्यग्रस्त असणार्‍यांसाठी ही मुले आदर्श आहेत. सर्व असूनही प्रयत्न कमी पडतात ते तेव्हा निराश होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही मुले प्रेरणा आहेत. जिद्द चिकाटी आणि माणुसकी यांची शिकवण आहेत. मोठ्या भावाला शासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी करायची आहे तर लहान भावाला मोठ्या भावाचा आदर्श समोर ठेवून सेट-नेट ची तयारी करायची आहे.या दोन्ही हिऱ्यांचे ईप्सित साध्य होवो. हया मनस्वी शुभेच्छा..!  यांचे शिक्षक म्हणून घेण्यास खरंच सर्वांना अभिमान वाटतो एवढे मात्र नक्की...!  डॉ.माधवी महाके अस्लमची तथा त्यांचे वडील अक्रम सय्यद ची कौटुंबिक परिस्थिती बेताची असून छोट्याशा पानशॉप व्यवसायांवर दैनंदिन रोजीरोटी चालवितात. पाचही मुले खूप शिकावे यासाठी धडपडत आहेत.घरात आठराविश्र्व द्रारिद्ये असल्याने दानशुर व्यक्ती, दानधर्म व्यक्ती, सामाजिक, शैक्षणिक संस्था व विविध संघटना यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे जिल्हाअध्यक्ष संजय ऊर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर यांनी केले आहे.
 
Top