Views


*प्रा.डॉ.महेश मोटे यांना अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डी. लीट पदवी मिळाल्याबद्ल मुरुम येथे विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
  
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांना मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवी नुकतीच प्रदान करण्यात आल्याबद्ल प्रा.डॉ.महेश मोटे यांचा श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांकडून सत्कार श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार होते. तर प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, प्रा.डॉ. सतिश शेळके, प्रा.डॉ.अरविंद बिराजदार, डॉ.रवि आळंगे, डॉ.जयश्री सोमवंशी, डॉ.संध्या डांगे, डॉ.शिला स्वामी, डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा.मुकूंद धुळेकर, विरभद्र बरबडे, आदि, उपस्थित होते. यावेळी डॉ.महेश मोटे यांचा उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोटे सरांना मिळालेल्या डी.लीट पदवी या बहुमानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनोज हावळे व सूत्रसंचालन प्रा.डॉ.राम बजगिरे यांनी केले तर आभार शितल पाताळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पांचाळ, आकाश पांचाळ, भरत गाडेकर, प्रिया बिराजदार, अंबिका पाताळे, पुजा शिंदे, शुभांगी कुलकर्णी, निकीता पाताळे, अंजली स्वामी, मोनिका बिराजदार आदींनी पुढाकार घेतला. यावेळी मोटे सरांचे विशेष अभिनंदन करुन विद्यार्थ्यांनी पेढे वाटून महाविद्यालयात आनंद साजरा केला. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.
 
Top