Views


*राज्य राखीव पोलीस बल 15 वर्षे बदलीच्या नियम रद्द करून 10 वर्षे करणे, पोलीसांच्या आशा विविध मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुरज आबाचने यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज आबाचने यांनी पोलिसांच्या विविध मागण्यांचे निवेदन उमरगा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रंहमंत्री, यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य राखीव पोलिस बल 15 वर्षे बदलीच्या नियम रद्द करुन 10 वर्षे करणे. 13 च्या पीयसआय पोलिस परीक्षा पास झालेल्या पोलिसांना पदोन्नती देणे. पोलिसांची पगारवाढ करणे, पोलिस अधिकारी - कर्मचारी यांना स्वमालकीची हक्काची घरे देणे, पोलिसांच्या कामाचे अवधी 12 तास न ठेवता 8 तास करणे, राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांना जिल्हा पोलीस दलात बदलून येण्यासाठी आता सलग 15 वर्षे सेवा असा प्रस्ताव आहे. पूर्वी ही अट 10 वर्षांची होती. या नव्या प्रस्तावामागे एसआरपीएफमध्ये मनुष्यबळाची कमतरता हे कारण सांगण्यात आले आहे. एसआरपीएफमधील पोलीस कर्मचाऱ्यांना सलग 10 वर्षे सेवा झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलात समकक्ष पदावर पाठविले जाते. एसआरपीएफची ड्युटी खडतर असल्याने जिल्हा पोलीस दलात जाण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या पोलीस भरतीच्या 10 टक्के जागा एसआरपीएफ जवानांसाठी राखीव ठेवल्या जातात. त्या जागांवर सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या केल्या जातात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून एसआरपीएफमध्ये बदल्यांचा घोळ घातला जात आहे. त्यातूनच या बदल्या ‘मॅट’ (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) आणि मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गाजल्या होत्या. आता या बदल्यांच्या अनुषंगाने आणखी एक नवा प्रस्ताव पुढे आला आहे. जिल्हा बदलीसाठी या जवानांना पूर्वी 10 वर्षे सलग सेवा ही अट होती. ती रद्द करून आता 15 वर्षे सलग सेवा अशी करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या अपर महासंचालक कार्यालयाने सादर केलेल्या या प्रस्तावावर गृहसचिव के.पी.बक्षी यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव आता कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाणार आहे. 10 ऐवजी 15 वर्षे सलग सेवेच्या या नव्या प्रस्तावामुळे राज्यातील सर्व 16 ही ग्रुपच्या एसआरपीएफ जवानांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. या जवानांना वर्षातील सहा महिने गडचिरोलीत सेवा द्यावी व ईतर ठिकाणी लागते. 10 वर्षांच्या सेवेनंतर जिल्हा पोलीस दलालाही तरुण कर्मचारी उपलब्ध होतो. शिवाय त्याला कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळतो, हा हेतू होता. मात्र आता 15 वर्षांच्या अटीमुळे प्रत्यक्ष बदली होण्यासाठी जवानांना किमान 18 ते 20 वर्षे लागण्याची शक्यता आहे. राज्य राखीव पोलीस बल 15 वर्षे बदलीच्या नियम रद्द करून 10 वर्षे करवे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

 
Top