*लोहारा तालुका पोलिस पाटील संघाच्यावतीने पो.नि. निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांचा सत्कार*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक कदम यांचा पोलीस पाटील संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. लोहारा पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. व तसेच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गोरोबा कदम यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे लोहारा तालुकाध्यक्ष सूर्यकांत पाटील, तालुका सचिव संजय नरगाळे, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा जगताप, ज्येष्ठ पोलीस पाटील शंकर पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र भोजने, तानाजी माटे, निळकंठ कोठावळे, सहदेव गिराम, धनराज हावळे, दादासाहेब मुर्टे, सुखराज कदम, बिरूदेव सूर्यवंशी, ईश्वर सुरवसे, बालाजी कदम, दीपक जाधव, अमोल गव्हाळे, मनीषा चाकुरे, लक्ष्मी यादव, शितल साळुंके यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील, लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संख्येने उपस्थित होते.