Views


*जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भाजपाच्या वतीने
जिल्हयातील दिव्यांग उद्योजकांचा पुरस्कार देवून सन्मान*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या दिव्य संकल्पनेतून दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे जिल्हयातील दिव्यांग उद्योजकांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रस भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा दिव्यांग आघाडी उस्मानाबाद समाधान मते, विठठल गायकवाड, पवन ढेकणे हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते वाघमारे मारूती लक्ष्मण, राठोड राहुल, राजु चव्हाण, दत्ता शेवाळे, गिरीश वैकुंठे, श्रीदेवी गायकवाड, शेख राणी, प्रकाश गोरे, इरफान शेख या स्वावलंबी दिव्यांग उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
 
Top