Views


*मराठवाडा लोकविकास मंच कडून देण्यात येणारा मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार गुंज संस्थेचे अजित कांकरिया यांना प्रधान* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 गुंज संस्था दिल्ली, संस्थेचे मराठवाडा समन्वयक श्री अजित कांकरिया  यांना मधुकर धस स्मृती धस स्मृती गौरव पुरस्कार 2020 मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने कळंब येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला. गुंज संस्थेच्या माध्यमातून अजित कांकरिया व त्यांचे  सहकार्यानी   लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील  गावांमध्ये 5000 गरीब कुटुंबातील व्यक्तींना धान्य वाटप करुन कोरोनामध्ये जगण्याचा आधार दिला, संस्थेच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी कार्य केल्याने या कामाची दखल घेऊन घेऊन त्यांना मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे अफार्म चे संचालक एम. एन. कोंढाळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय संस्थेचे संस्थापक विश्वनाथ तोडकर, प्राचार्य गोविंद बिराजदार, प्राचार्य व्यंकट अनगुंठे, रोहयो चे महाराष्ट्रचे प्रवक्ते प्रमोद झिंजाडे, समाज विकास संस्थेचे संस्थापक भुमिपुत्र वाघ, गुंज संस्थेचे प्रशांत रणदिवे, प्रदीप वाघमारे, उपस्थित होते.

 
Top