Views
*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात राहुलदा पाटील मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक भावना जपत विविध सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी होते. तर प्रमुख म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. शितलताई राहुल पाटील, जि.प. समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, ज्येष्ठ कवी फ.पा‌.शहाजिंदे, सरपंच यशवंत कासार, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कमलाकर शिरसाट, माजी सरपंच विजयकुमार शिरसागर, डॉक्टर सुनील मंडले, आदि, उपस्थित होते. यावेळी वाढदिवस व जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सास्तूर येथील अपंग निवासी शाळेतील दिव्यांगांना सकस आहाराचे किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. व कोविड 19 महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता हे मोलाचे सहकार्य करून अनेकांना कोरोनाच्या महामारी पासून सुरक्षित ठेवले अशा सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार व माकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी,  तसेच सास्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, शिक्षक, आशाताई कार्यकर्त्या व सास्तूर औट पोस्टचे पोलीस कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात आले. व तसेच हर्षवर्धन भैया चालुक्य पाटील मित्रमंडळ होळी यांच्यावतीने अपंग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सोय म्हणून पाण्याची टाकी भेट देण्यात आली. व सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगीरथ गायकवाड सर यांनी केले तर आभार माजी सरपंच विजयकुमार शिरसागर यांनी मानले. या कार्यक्रमास डॉक्टर संतोष मनाळे, सरपंच विजयाताई लांडगे, गोविंद यादव, किशोर स्वामी, नेताजी पवार, किसन पवार, समीर पवार, वीरेंद्र पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, महेश पोतदार, हिरा गायकवाड, शुभम साठे, साताप्पा चिवरे, मन्सूर बागवान, उमेश इगवे, मुरली पवार, गोविंद पवार, आनंद हासुरे, विशाल जगताप,यांच्यासह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top