Views
*नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने लोहारा तालुक्यातील शाळा, महाविद्यालय मध्ये कोरोना जनजागृती*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे व कार्यक्रम व लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली राष्ट्रीय युवा स्वंयसेवक किशोर होनाजे यांच्या वतीने लोहारा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात कोरोना जनजागृती हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील शाळा व महाविद्यालय येथे कोरोना संबंधित जनजागृती पत्रक वाटप करण्यात आले. कोरोना रोगाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती जगभरात तयार होत आहे. महाराष्ट्रात 9 वी पासून पुढील वर्ग सुरु होत आहेत. त्या अनुषंगाने श्री बसवेश्वर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय जेवळी, लोहारा हायस्कूल लोहारा, वसंतदादा पाटील विद्यालय लोहारा, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा इत्यादी शाळा, महाविद्यालय येथे पत्रक वाटप करून विद्यार्थी मध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली.
 
Top