Views
*योजना तर भरपूर आहेत, पण अंमलबजावणी करीत नसतील तर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल -- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शिंदे*
 
उस्मानाबाद :-(इकबाल मुल्ला)

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या बऱ्याच महत्वाकांक्षी योजना आहेत, पण पण अंमलबजावणी करीत नसतील तर आम्हाला आमचा हक्क प्राप्त करून घेण्यासाठी प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शिंदे यांनी केले. 
उमरगा तालुक्यातील अपंग, अनाथ मतिमंद शाळेवर पत्रकार तथा बाल विवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी आयोजित केलेल्या दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, मराठवाडा अध्यक्षा वृन्दावणे गवळी, जिल्हाध्यक्ष रसूल शेख, तालुकाध्यक्ष इसाक शेख, महिला तालुकाध्यक्षा निर्मला सुरवसे यांच्यासह प्रहार संघटना आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उमरगा नगर परिषद च्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संविधान प्रस्तावना चे सामूहिक वाचन करण्यात आले. या दिव्यांग सोहळ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातूनच न्हवे तर जिल्ह्याच्या बाहेरून पण दिव्यांग बंधू व भगिनींनी या मनोधैर्य वाढविणाऱ्या मोटीवेशनल सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला. अपंग व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विशेषतः लहान मुलांमध्ये अपंगत्वाचे निदान लवकर होऊन त्यावर उपचार आणि योग्य प्रशिक्षणाची सोय व्हावी ही आजच्या दिनी अपेक्षा असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उमरगा तालुक्यातील बाबा जाफरी सोशल फाऊंडेशन चे संस्थापक बाबा जाफरी, उमरगा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. प्रविन तोतला, ऍड.सिद्राम, उद्योजक चंद्रकांत कुंभार, तानाजी बनसोडे, गणेश घोडके आणि अजीम सय्यद, आदींनी सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी उपस्थित सर्व दिव्यांग बंधू भगिनींना मनोबल वाढवून त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करून शिका, संघर्ष करा आणि सर्वात महत्वाचे संघटित व्हा, असे म्हणत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. तर पत्रकार सचिन बिद्री यांनी भारतीय राज्यघटनेतील भाग तीन मधील मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देत हताश न होता. ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून काटेरी वाटेवर चालण्याची जिद्द बाळगण्याबाबत मोटीवेशनल भाष्य करून कार्यक्रमात नवा उत्साह निर्माण केला. तर कार्यक्रमात सर्व दिव्यांगना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बसवराज मसरे यांनी सकाळपासूनच स्वतः आपल्या हातानी, खमंग स्वादिष्ट रुचकर असे मिष्टान्न स्वयंपाक करून आपल्या पाककलेतून सर्व दिव्यांगांची मने जिंकली,कार्यक्रमात उपस्थित जवळपास दीडशे पेक्षा अधिक दिव्यांग बंधू भगिनींना याचा आस्वाद घेता आला, तसेच या क्षणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख यांचा जन्मदिन येथील अनाथ, मतिमंद अपंग मुलांच्या सानिध्यात पार पडला. दिव्यांगांची व्यथा जाणून, मनोबल वाढविणाऱ्या या सोहळ्यात कराड हुन डोळ्यानी अंध दिव्यांग महिला संगीता शिवाजी सुरवसे या आवर्जून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बिद्री यांनी केले तर आभार राचय्या स्वामी यांनी मानले.

 
Top