Views


*बालविवाह प्रतिबंध समितीच्या सतर्कतेमुळे टळला नियोजित 'बालविवाह'*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 उमरगा शहरातील पोलीस लाईन समोरील वडार वस्तीतील एका अल्पवयीन मुलीचा, दि 15 डिसेंबर 2020  रोजी बालविवाह संपन्न होणार असल्याची गुप्त माहिती बालविवाह प्रतिबंध समिती उस्मानाबाद आणि जिल्हा महिला व कल्याण विभागाला गुप्त बातमीदारामार्फत समजली,यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करत समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी प्रशासणाच्या साह्याने संबंधित परिवारातील सर्व सदस्यांचे समुपदेशन करून नियोजित बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले. याबाबत अधिक माहिती अशी की,  उमरगा शहरातील पोलीस लाईन च्या विरुद्ध बाजूस असलेल्या वडार वस्तीतील एका अल्पवयीन मुलीचे 15 डिसेंबर 2020 रोजी बालविवाह रचिले गेले असल्याबाबत गुप्त माहिती उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीला समजली. याबाबत अधिक माहिती घेतल्यावर समिती सदस्यांना माहिती भेटली की उमरगा शहरातील इयत्ता दहावीत सदर मुलगी असून जीचे वय 17 वर्ष असल्याचे समजले, त्यावरसमितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उमरगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद आघाव, आणि नगरपालिका मुख्याधिकारी जाधवर यांना माहिती दिली आणि शुक्रवारी समितीचे सदस्य सचिन बिद्री, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी एस. एम‌.काझी, गफूर औटी, बिट अंमलदार बालाजी कामत्कर, जयहरी वाघूलकर, महिला पोलीस शोभा पवार, नगर पालिकेचे अजय सानप, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस आदींनी मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या पालकांना समुपदेशन करून लेखी स्वरूपात, ज्यामध्ये मुलीचे १८ वर्ष पूर्तीनंतर विवाह करण्याबाबत पालकांकडून व उपस्थित पंचासमक्ष  हमीपत्र घेऊन समुपदेशन करून, चार दिवसानंतर होणारा नियोजित बालविवाह रोखण्यात समितीला यश आले.
-----------------------------------------------------------------------
"समाजातील अनिष्ट प्रथेमुळे,अविचारी निर्णयामुळे आज कित्येक मुलींना लग्नानंतर च्या जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतोय, अवेळी प्रसूती मुळे त्यांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. आपल्या मुलीच्या सदृढ आयुष्यमानासाठी,त्यांच्या सुखी जीवनासाठी पालकांनी क्षणभर विचार करणे गरजेचे आहे.बालविवाह प्रतिबंध समिती मार्फत जनजागृती बालविवाह रोखण्यासाठी चालू असलेले कार्य कौतुकास्पद"- *बाबा जाफरी, सामाजिक कार्यकर्ते*
-----------------------------------------------------------------------
'भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क आणि कर्तव्ये नमूद आहेत,हक्कांची अंमलबजावणी करताना कर्तव्ये पण पार पाडून एक संघटित, विवेकी समाज घडविण्यात प्रत्येकांनी जबाबदारी घेणे आवश्यक.बालविवाह, हुंडाप्रथा सारख्या प्रथेविरोधात प्रत्येकांनी चळवळीत सामील व्हावे"- *मुकुंद आघाव,पो.नि.उमरगा
---------------------------------------------------------------------
"हुंडाप्रथा, बालविवाह, आणि स्त्रीभ्रूण हत्या अश्या अनिष्ठ प्रथेविरोधात प्रत्येक वर्गातील सर्वसामान्य जणमानसातून विरोध निर्माण होणे गरजेचे आहे"- युवराज (दाजी) जाधव, मा.उपसभापती पं. स.उमरगा
 
Top