Views


*ग्रामीण रुग्णालय वाशी च्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा.....* 
 
उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

            मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील सर व वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपिलदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाने  दि.1 डिसेंबर "जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला."जागतिक एकता,सामायिक जबाबदारी" "Global Solidarity,Shared Responsibility" या घोष वाक्याच्या अनुशंगाने वाशी शहरातील शिवाजी चौक येथे अँटो रिक्षा चालक तसेच उपस्थित नागरिक यांना एचआयव्ही /एड्स विषयी माहिती पत्रिका व पुस्तके वाटप करुन जनजागृती करण्यात आली.
       या कार्यक्रमासाठी आयसीटीसी समुपदेशक श्री. परमेश्वर तुंदारे व आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री।संतोष बुधोडकर यांनी परिश्रम घेतले.जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने सर्व वाहन चालक व मालक तसेच गरोदर माता , संवेदनशील गटातील व्यक्ती नी आपली एचआयव्ही तपासणी करून घेण्यात यावी असे मा.वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपिलदेव पाटील यांनी अवाहन केले आहे.
            या कार्यक्रमास वाशी नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री. नागनाथ नाईकवाडी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपिलदेव पाटील, अँटो रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शेटे, संजय कवडे तसेच वाहन चालक मालक संघटनेचे सचिव श्री. गणेश धुमाळ व सर्व चालक मालक उपस्थित होते.

 
Top