Views


*रुपामाताच्या नावाला तडा जाऊ न देता घोडदौड कायम राहील - ॲड.गुंड*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

सध्याचे जग स्पर्धात्मक असून या स्पर्धेत टिकण्यासाठी गतिमान सेवा देणे अत्यंत गरजेचे आहे. रुपामाता परिवार गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटत असून या परिवाराने अनेक क्षेत्रांमध्ये भाग घेऊन आपला ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी संस्थेची निर्मिती केली असल्यामुळे रुपामाताच्या नावाला तडा जाऊ न देता ही यशस्वी घोडदौड कायम राहील, असा विश्वास रुपामाता परिवाराचे अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड यांनी दि.30 डिसेंबर रोजी व्यक्त केला. रुपामाता अर्बन व मल्टी स्टेट को - ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या १७ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक जिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, राजाभाऊ वैद्य, रंगनाथ कदम, शंकरराव गाडे, सौ सुलभा गुंड, सौ भाग्यश्री जाधव, सौ महानंदा माने, त्रिवेणीबाई गरड सहदेव ढाकरे, बाबुराव पुजारी आदी उपस्थित होते. रुपामाता मल्टीस्टेटची 9 वी वार्षिक सर्वसाधारण सभा तर रुपामाता अर्बन सोसायटीची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा एकत्र घेण्यात आली. यावेळी बोलताना ॲड. गुंड म्हणाले की, भाड्याच्या जागेत सुरू केलेल्या या संस्थेचे आज दोनशे कोटी ठेवी कडे वाटचाल सुरू असून संस्थेच्या मालकीच्या जागेत सहा ठिकाणी कारभार चालू आहे. सर्व सभासद, कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून कोरोना कालावधीत रुपामाता परिवाराच्यावतीने अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरु करुन निराधारांना आधार देण्याचे काम करण्यात आले. तसेच संस्थेची गुंतवणूक राष्ट्रीयीकृत बँकेत करण्यात आली असून संस्थेमध्ये 189 कोटी 34 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर संस्थेची एकुण 28 कोटी 73 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. तसेच भांडवल 2 कोटी 81 लाख रुपये असून संस्थेने आतापर्यंत 136 कोटी 96 लाख रुपयाचे कर्ज वितरित केले आहे. यामध्ये 21 कोटी 43 लाख रुपये सोनेतारण कर्ज वाटप केले असून संस्थेचा सीडी रेस्यू 76 टक्के आहे. यावेळी ॲड.गुंड यांनी कोरोना व लॉकडाऊनच्या काळात देखील संस्थेने चांगल्या प्रकारे कार्य करून स्पर्धेत आपले पाय रोवले आहेत. तसेच संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दहा टक्के लाभांश देण्याचे घोषणाही त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी म्हणाले की, सभासदांच्या समर्थ साथीमुळे व खंबीर विश्वासामुळे संस्थेने यशस्वी वाटचाल केली आहे. या पतसंस्थेला नेहमीप्रमाणे अ ऑडिट वर्ग मिळाला आहे. सभासदांचे पाठबळ, सहकार्य यामुळेच ही यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सरव्यवस्थापक सत्यनारायण बोधले यांनी विषयाचे वाचन केले व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद खांडेकर, कायदेशीर सल्लागार विद्युलता दलभंजन व गोपाळ जंगाले आदी उपस्थित होते. दरम्यान सभेच्या सुरुवातीस विविध क्षेत्रातील व कोरोना विषाणूंच्या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या तसेच पोलिस विभाग व कोरोना योद्धा यांचा सन्मान व गौरव करणारा ठराव पारित करण्यात आला. यावेळी उत्तम कार्य करणाऱ्या शाखेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 
Top