Views


*लोहारा शहरातील क्रिकेट स्पर्धेत किंग कोब्रा संघ विजेता तर औसा येथील अजय बॅटरीज संघ उपविजेता* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने भव्य (4 - 4 षटकाच्या) खुल्या टेनिस बॉल स्पर्धेचे शहरात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील किंग कोब्रा संघ विजेता तर औसा येथील अजय बॅटरीज संघ उपविजेता पद पटकावले. या स्पर्धेत एकुण 40 संघांनी सहभाग नोंदवला.नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे यांच्या तर्फे 15 हजार रुपये व रियाज खडीवाले यांच्या तर्फे चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. उपविजेता अजय बॅटरीज संघास अमीन सुबेकर तर्फे 11 हजार, रियाज खडीवाले तर्फे चषक, तिसऱ्या विजेता लोहारा इंडियन्स संघास योगीराज सोळसे तर्फे 7 हजार, रियाज खडीवाले तर्फे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासह विविध बक्षिसे यावेळी देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाला माजी ग्रा.पं.सदस्य दिपक मुळे, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, तंटा मुक्ती अध्यक्ष अमीन सुबेकर, स्वप्नील माटे, प्रवीण स्वामी, राजपाल वाघमारे, उपस्थित होते. अंतिम सामन्यात पंच म्हणून सचिन भोसले व गोपाळ सुतार यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उत्तम समालोचन अनिल बोदमवाड,  अस्लम खानापुरे, सतीश ढगे, दिपक रोडगे, सुलेमान सौदागर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किंग कोब्रा मंडळाचे भिमाशंकर डोकडे, गगन माळवदकर, ओम पाटील, मनोज लोहार, किरण पाटील, ईश्वर बिराजदार, शंभुलिंग स्वामी, महेश चपळे, सुनील शिंदे, स्वप्नील स्वामी, सुवन डोकडे, गिरीश जट्टे, अदिंनी परिश्रम घेतले.
 
Top