Views


*पोलिस पाटील सोनवणे यांचा रावले यांच्या हस्ते सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कोरोना कालावधीत गावोगावच्या पोलिस पाटील यांनी अतिशय योग्य व अचूक नियोजन करून त्याची अंमलबजावणी गावकऱ्यांच्या साह्याने केल्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी बऱ्यापैकी यश आले. त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने पोलिस पाटील यांचा सन्मान करण्यात आला. उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथील पोलिस पाटील राजेंद्र कल्याण सोनवणे यांचा ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सपोनि योगेश शिंदे, दीपक खांडेभरार, पोना पठाण यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
 
Top