Views


*जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते डॉ.क्रांतीसूर्य माने यांचा सत्कार....*
 
*उस्मानाबाद:-[सैफोद्दीन काझी]*
(दि.11)आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) 2020च्या परीक्षेत डॉ.क्रांतीसूर्य मोहनराव माने यांनी भारतात 513 वा क्रमांक प्राप्त केला आहे.या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मी त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. हे यश निश्चितच उस्मानाबाद जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे,असे गौरउद्दगार काढून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.डॉ.माने यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले तर MBBS केईएम हॉस्पीटल मुंबई येथे झाले.विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा भारतात 7 वा क्रमांक आला आहे.
         यावेळी डॉ.क्रांतीसूर्य माने याचा सत्कार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला.डॉ.माने यांच्या या कौतुकस्पद कामगिरीमुळे जिल्हयाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
         आपण भविष्यातही वैदयकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करुन जिल्हयातील आरोग्य क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास करुन त्या दूर करण्यात हातभार लावाल,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली.
 
Top