*कोरोना महामारीत पोलीस पाटील यांचे मोलाचे काम - पोलीस अधीक्षक रोशन, जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान*
उस्मानाबाद :-( इकबाल मुल्ला)
कोरोना महामारीच्या संकटात जिल्ह्यातील पोलीस पाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाचे काम केले आहे, पोलिसांच्या पुढे जाऊन त्यांनी योगदान दिले आहे, असे प्रतिपादन उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांनी केले. उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने पोलीस पाटील दिनाचे औचित्य साधून दि, 17 डिसेंबर 2020 रोजी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचा कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन बोलत होते. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून प्रोबेशनरी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बाबर, आदीं, उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे म्हणाले की, कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, पुणे, मुंबई सारख्या शहरातून आलेल्या लोकांना विलगिकरण करताना पोलीस पाटील यांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे, ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी,असे आवाहन केले. यावेळी गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, सचिव धनंजय गुंड, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे, दिनकर पाटील, महेशंकर पाटील, प्रमोद माळी, परेश शिंदे, अश्विनी वाले, सुकुमार फेरे, श्रुतिका हाजगुडे, स्वाती गवाड, मनीषा घेवारे, सुनीता जगदे, अमृता माळी, आदी उपस्थित होते,