Views


*उस्मानाबाद बस स्थानकात होत असलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय थांबण्यात यावी -- भाजपा विद्यार्थी आघाडी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद बस स्थानकात होत असलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय थांबण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विद्यार्थी आघाडी यांच्यावतीने आगार प्रमुख 
महाराष्ट्रा राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउन नुकतेच शिथील झाले असून महाराष्ट्र शासनाने शाळा व कॉलेज  चालू केले आहेत. बाहेर गावी राहत असलेले विद्यार्थी हे आगारा मध्ये पास काढण्यासाठी येत असल्याने गर्दी होत आहे, यामुळे कोरोना संसर्ग मोठया प्रमाणात होण्याची शकयता नाकारता येत नाही. यामूळे विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी हि गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी आपण विद्यार्थाना ऑनलाईन पास काढण्यासाठी मदत करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दादुस गुंड पाटील, अक्षय भालेराव, ज्ञानेश्र्वर पडवळ, उपस्थित होते
 
Top