Views


*लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमीत्त उमरगा शहरात साहेब प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उमरगा शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयात भाजपचे दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणनिमित्त साहेब प्रतिष्ठानच्या वतीने भाजपाचे सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे बालाजी कोराळे, अरुण अंबुलगे, बाळू माने, शुभम मुळजकर, युवा मोर्चाचे महादेव सलके, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top