Views


*कोरोनाच्या काळात गुंज संस्थेच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी अजित कांकरिया यांनी सामाजिक कार्य केल्याने यांना कार्याची दखल म्हणून मराठवाडा लोक विकास मंच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने मधुकर धस स्मृती पुरस्कार जाहीर केला आहे*
 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 
कोरोनाच्या काळात गुंज संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक कार्य केली होती. या कार्याची दखल म्हणून मराठवाडा लोक विकास मंच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने मधुकर धस स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशा आशयाचे पत्र गुंज संस्थेचे पदाधिकारी अजित कांकरिया यांना देण्यात आले आहे. गुंज संस्थेच्या माध्यमातून लातूर, उस्मनाबाद, बीड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कामे चालू असून, यामध्ये प्रामुख्याने लोकांकडून श्रमदान करून घेणे व त्यांना ग्रह उपयोगी साहित्याची मदत करणे, शाळेच्या विकासासाठी त्यांच्या पालकांकडून काही काम करून घेऊन शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, गावातील गरीब मुलीच्या लग्नकार्यासाठी साहित्य स्वरूपात मदत करणे, एखाद्या गरीब मुलीची डिलिव्हरी झाली असेल तर त्याच्या लेकरासाठी मदत करणे, एकंदरीत लोकांची गरज व आपल्याकडे असलेले साहित्य त्याची सांगड घालून त्यांना मदत केली आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना कामधंदा नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे, अशा लोकांना हाताला काम नाही, त्यामुळे लोकांची उपासमार होऊ नये म्हणून गुंज संस्थेने अनेक गरजू लोकांच्या मदतीला उभे राहून किराणा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक वस्तू यात पीठ, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मिरची पावडर, हर्डी पावडर, साबण अशा वस्तूंचा समावेश आहे. व हे साहित्य जवळपास एक महिना पुरेल एवढे साहित्य वाटप केले आहे. आदी केलेल्या कामांचा गौरव म्हणून मराठवाडा लोक विकास मंच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने दि.3 डिसेंबर रोजी कळंब याठिकाणी पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. तसेच अजित कांकरिया यांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top