Views
*काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस उदगीर येथे साजरा* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार व माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर चे पालकमंत्री ना.अमितराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आ.धीरज देशमुख, काँग्रेस कमिटीचे लातूर जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन भारतीय काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस यांच्या वतीने 136 वा.स्थापना दिवस उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरण व उद्देशा बद्दल बोलताना असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष संजय उर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दिष्ट आहे अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे. यांची स्थापना २८ डिसेंबर १८८५ साली झाली. या स्थापना दिवसाला आज (दि.२८) डिसेंबर २०२० वार सोमवार रोजी १३६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण संजय उर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गौतम पिंपरे, हमाल- मापाडी - माथाडी -गाडीवान असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम भालेराव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदर्श पिंपरे, प्रल्हाद किंवडे, राजकुमार सोनकांबळे, अभंग सूर्यवंशी, विलास बनसोडे, गाडीवान काँग्रेसचे गौस पठाण, शेख मुजीत, इस्माईल सुतार, आनंद किंवडे, राजेश सुतार, उत्तम गायकवाड, निलेश नागराळे, राम कांबळे, अविनाश वाघमारे, शेख खलील, भरत सूर्यवंशी, विशाल गायकवाड, महेश सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, चंद्रकांत गायकवाड, चंद्रकांत कांबळे, शरद मटके, राहुल गायकवाड, अंकुश मानकरी, सतीश सूर्यवंशी, आकाश नागराळे, कुणाल नागराळे, बबलू सोनकांबळे, भीमराव कांबळे, शेख जमील साब आदी उपस्थित होते.
 
Top