Views


  *बसव ब्रिगेड सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी गणेश खबोले यांची नियुक्ती*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अखिल भारतीय लिंगायत युवा मंच प्रणित बसव ब्रिगेड संघटनेच्या सोशल मीडिया आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गणेश खबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बसव ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. अविनाश भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसव ब्रिगेड सोशल मीडिया आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास वाघमारे,जिल्हा अध्यक्ष परमेश्वर पाटील यांनी पत्रकार गणेश खबोले यांना नियुक्तीचे पत्र दिले. पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व ही खबोले यांची वैशिष्ट्य आहेत. महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजाच्या सर्व स्थरापर्यंत नेऊन समाजच्या आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक, राजकिय प्रगतीसाठी व समाजाच्या विचारांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यामध्ये लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे लिंगायत समाजाची ताकदही मोठी आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या कृपेने मला या संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचे सोने करण्याचा मनापासून प्रयत्न करेन.असे त्यांनी सांगितले. समाज मोठ्या संख्येने असला तरी तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. बसव ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या सहाय्याने समाजाला संघटित करण्याचे तसेच समाजातील शेवटच्या समाजबांधवाला न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे यावेळी पत्रकार गणेश खबोले यांनी सांगितले. खबोले यांच्या निवडीनंतर समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 
Top