Views


  *परंडा येथील दैनंदिन बाजार पूर्वीप्रमाणे मंडई पेठ येथे सुरू करण्यात यावा -- भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अँड.जहीर चौधरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

परंडा येथील दैनंदिन बाजार पूर्वीप्रमाणे मंडई पेठ येथे सुरू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अँड.जहीर चौधरी यांच्यावतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत परंडा तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगभरात कोरोना या रोगाने थैमान घातले होते. परंतु सध्या परिस्थिती आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी मागील आठ महिन्यापासून बंद असलेले रविवारचे आठवडा बाजार सुरू केले आहे‌. त्याचप्रमाणे
 मंडई पेठ येथील दैनंदिन भरणाऱ्या बाजार भाजी पाला व फळ विक्रेत्यांचा बाजार पूर्वीप्रमाणे नगरपंचायत परंडा यांनी सुरु करणे जरुरी असताना राजकीय द्वेषापोटी सूडबुद्धीने सदरील दैनंदिन बाजार सुरू नाही. त्यामुळे अनेक लोकांचा रोजगार ठप्प झालेला आहे. त्यामुळे सदरील दररोजचे बाजार मंडई पेठ येथे सुरू करण्या बाबत नगरपरिषद परंडा यांना आदेशित करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अँड.जहीर चौधरी, भाजपा
 तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका सरचीटणीस विठ्ठलजी तिपाले, जि.प.माजी सभापती रमेश नाना पवार, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनील पाटील, ॲड.अभयसींह देशमुख, दत्तु अनबुले, उपस्थित होते.
 
Top