Views


*भुजंगराव घुगे व जयंतराव पाटिल यांना लोहारा संघ परिवारातर्फे श्रद्धांजली वाहिली*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 विश्व हिंदू परिषदेचे दक्षिण भारत प्रचारक तथा धर्मप्रसार प्रमुख,अणदूर येथील स्व.भुजंगराव वामनराव घुगे यांचे लखनौ येथे अल्प आजाराने आणि रा.स्व.संघ, ग्रामविकास लातूर विभाग सहसंयोजक तथा लातूर उस्मानाबाद जिल्हा समन्वयक, उमरगा येथील स्व.जयंतराव किशनराव पाटील यांचे येळी येथे अपघाती निधन झाले. या दोन्ही त्यागमुर्तीना लोहारा तालुका संघ परिवार यांच्या वतीने शहरातील भारतमाता मंदिर येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लोहारा तालुका संघचालक अशोकराव पाटील, लोहारा तालुका पालक श्रीराम पुजारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शहाजी जाधव, दत्तात्रय दंडगुले, जनकल्याण समितचे शंकर जाधव, तालुका कार्यवाह दत्तात्रय पोतदार, सहकार्यवाह मुरलीधर होनालकर, संजय जेवळीकर, शिवाजी फुलसुंदर, जगदीश लांडगे, अशोक शिंदे, सुधीर कोरे, श्रीनिवास माळी, वीरभद्र स्वामी, मनोज तीगाडे, प्रा.यशवंत चंदनशिवे, ओम कोरे, कल्याण ढगे, सतीश गिरी, मधुकर कदम, यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करताना जनकल्याण समिती प्रकल्प प्रमुख शंकर जाधव यांनी त्यांच्या जीवनातील काही प्रसंगा विषयी सांगून या दोन्ही व्यक्ति अचानकपणे निघून जाण्याने कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच या दोघांच्या कार्याचे वर्णन " मन समर्पण, तन समर्पण, औंर यह जिवन समर्पण" या समर्पक शब्दात भावना व्यक्त केल्या. याबरोबरच अशोक शिंदे, जगदीश लांडगे, यांनीही श्रद्धांजली पर भावना व्यक्त करून या दोन्ही व्यक्ती सर्वासाठी प्रेरणा देणारे होत्या आणि साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे ते सदैव राष्ट्र कार्यासाठी तत्पर व्यक्तिमत्व होते असे सांगून, उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
Top