Views


*भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठवाडा पदवीधर नोंदणी प्रमुख शिरीष बोराळकर यांची बैठक*


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठवाडा पदवीधर नोंदणी प्रमुख शिरीष बोराळकर यांचे प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान भवन येथे मराठवाडा पदवीधर निवडणुकीसंदर्भात प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली. आगामी पदवीधर निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने सजग राहून कामाला लागावे, पदवीधरांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच कटिबद्ध आहे. सातत्याने ह्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून येत असतो व ह्या वेळेसही भाजपाचा उमदेवारच निवडून येण्यासाठी कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी यांनी कार्यरत रहावे असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजयुमो अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, दाजीआप्पा पवार, सुजित साळुंके, योगेश जाधव, नामदेव जाधव, महेश चांदणे, पूजा देडे, पूजा राठोड, मनोज रणखांब, आशिष नायकल, बालाजी गावडे, निलेश शिंदे, प्रवीण पाटील, राहुल शिंदे, दादुस गुंड, अक्षय भालेराव, शरीफ शेख, नाना घाडगे, नानासाहेब कदम, हिम्मत भोसले, निरंजन जगदाळे, अक्षय कांबळे, विशाल कांबळे, रजवी फैसल, काजी वजाहत, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top