Views


*ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र राज्यचा ओबीसी आरक्षण बचाव ढाल मोर्चा संदर्भात बैठक व लोहारा तालुकाध्यक्षाची निवड*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

ओबीसी आरक्षण बचाव ढाल मोर्चा दि.6/11/2020 रोजी तुळजापूर येथे होणार आहे. यासंदर्भात लोहारा येथील माऊली कॉम्प्लेक्स मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशध्यक्ष रमेशजी बारसकर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, बाळासाहेब चिखलकर, लोमेश काळे जिल्हा कार्याध्यक्ष, अशोक माळी, मारुती रोकडे, नगरसेवक श्रीनिवास माळी, समता परिषद तालुकाध्यक्ष चिदानंद स्वामी, सोसायटी संचालक ऐनोद्दीन सवार, माजी सरपंच अप्पासाहेब पाटील, सौदागर गोरे, राजेंद्र माळी शाखा अभियंता सां बा., नारायण माळी समता परिषद तालुकाउपाध्यक्ष, ग्रामसेवक रमेश वाघमारे, अमोल माळी समता परिषद लोहारा शहराध्यक्ष, बाबा माळी, डॉ.ज्ञानेश्वर फुलसुंदर, जालिंदर माळी कृषी साहाययक, सुग्रीव माळी, संजय काटे, नरहरी माळी, राजेंद्र क्षीरसागर, ज्ञानेश्वर वाघमारे, सोमनाथ माळी, डी.के.माळी, आदी उपस्थित होते, या बैठकीमध्ये मोर्चा संदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र राज्य लोहारा तालुकाध्यक्ष म्हणून नागेश फुलसुंदर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशध्यक्ष रमेश बारसकर यांच्या हस्ते देण्यात आले.
 
Top