Views


*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान दिवाळीच्या सनापूर्वी देण्यात यावे -- भाजपाची मागणी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणा पूर्वी तात्काळ मदत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन लोहारा तालुका भाजपा व युवा मोर्चा भाजपा यांच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी व सततच्या अतिवृष्टीचा फटका बसल्याने लोहारा शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबीन, उडीद, तूर, बागायती व इतर पिके हातातून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिलेली नाही. त्यातच शासनाने शेतकऱ्यांची काळजी न करता तोकडी मदत जाहीर केली, परंतु ही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पोचलेली नाही. तसेच या अतिवृष्टीत मोठे नालेच्या बाजूच्या  जमिनी खरडून गेल्या आहेत, याचे अद्याप पर्यंत पंचनामे ही झालेले नाहीत, यांना देखील मोबदला दिला नाही. तरी मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीची जी कांही मदत जाहीर केली, ती मदत दिवाळी सणाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ टाकावी, अन्यथा भाजपा व भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसिंहा निंबाळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, पं.स. सदस्य वामन डावरे, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, भाजप मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कमलाकर शिरसाट, शुभम साठे, भोजप्पा कारभारी, बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, काशीनाथ घोडके, उदय कुलकर्णी, किशोर होनाजे, विक्रम सिंग राजपूत, शिवाजी सूर्यवंशी, लक्ष्मण माने, बिरू सोनटक्के, ज्ञानेश्वर पवार, राहुल पवार, बालाजी सोनटक्के, यांच्यासह भाजपाचे व युवा भाजपा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top