Views






  *लोहारा शहरात जिल्हा स्तरीय अधिकारी यांची भेट* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 लोहारा शहरात दि.31 ऑक्टोंबर 2020 रोजी डेंग्यु, चिकनगुण्या, संमिश्र लागण असे तीन अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पांचाळ, आरोग्य सहाय्यक आदटराव, किटक जमाकर्ते, सोळुंके यांनी भेट देऊन नगरपंचायत व आरोग्य विभागाला सुचना दिल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण बिराजदार, आरोग्य सेवक मोकशे, मुख्याधिकारी नगरपंचायत यांचे प्रतिनिधी मुंडे, अदि, उपस्थित होते. खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ.आमलेश्चर गारठे यांच्या दवाखाण्यास भेट देऊन तापीच्या रुग्णांचे सध्याचे प्रमाण व कल याबद्दल चौकशी करण्यात आली. पॉझिटीव्ह रुग्णांना गृहभेट देऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यात आली. तसेच एकूण इतर दहा घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. आणि आरोग्य विभाग तसेच नगरपंचायत विभागांना सूचना देण्यात आल्या.
 *आरोग्य विभाग*
कर्मचाऱ्यांना उजळणी प्रशिक्षण देऊन ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वे, अबेटिंग यांचा दुसरा राऊंड घेणे व सर्वेक्षणाचा दर्जा कायम राखणे.
 *नगरपंचायत विभाग*
स्पीकर, होर्डिंग्ज द्वारे जनजागृती करणे, परिसरातील नाल्या वाहत्या करणे, शक्य नसेल त्याठिकाणी खराब ऑईल टाकणे, परिसरातील वाढलेले गवत काढणे, परिसर स्वच्छता मोहीम राबविणे,हविशिष्ट ठिकाणी कीटकनाशक फवारणी न करता संपूर्ण शहरात दुसरा राऊंड घेणे. आरोग्य विभागाशी समन्वय ठेऊन साथ उद्भवणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना करणे.

 
Top