Views


  *जेवळी येथील निवृत्त शिक्षण अधिकारी बाबुराव माळी यांनी लिहिलेल्या 'रंग माझा वेगळा' या आठव्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

 लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रहिवासी असलेले निवृत्त शिक्षण अधिकारी बाबुराव माळी यांनी लिहिलेल्या 'रंग माझा वेगळा' या आठव्या पुस्तकाचे प्रकाशन कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने येथील निवृत्ती जिल्हा न्यायाधीश अशोक येणेगुरे यांच्या हस्ते पार पडले. जेवळी येथील रहिवासी असलेले निवृत्त शिक्षण अधिकारी बाबुराव माळी यांनी लिहिलेल्या 'रंग माझा वेगळा' या त्यांच्या आठव्या पुस्तकाचे प्रकाशन बसवेश्वर मंदिरातील संस्कृती सभागृह निवृत्त जिल्हा न्यायाधीश अशोक येणेगुरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव भुसणे हे होते. लेखक बाबुराव माळी हे शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त या पदा बरोबरच शिक्षणासंबंधी विविध पदावर काम केले आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर लेखनाकडे वळले गेला पाच वर्षात आतापर्यंत त्यांचे मायेची माणसं, उध्व्दवस्त गावची गौरवशाली गाथा, माझी शाळा माझे विद्यार्थी, निर्मळ मनाची प्रेमळ माणसं, सोबती, अजब तुझे सरकार, तेथे कर माझे जुळती, रंग माझा वेगळा असे आठ पुस्तके प्रकाशित झाले आहेत. आता रंग माझा वेगळा या पुस्तकात  कोकणातील एका खेड्यात जन्मलेल्या सौ. स्वाती चव्हाण या शिक्षिकेने विविध पातळीवर संघर्ष करीत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून कुटुंबाला नकोशी असलेल्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त या दलित शिक्षिकेेच्या संघर्षमय जीवन यात लेखकांनी उलगडून दाखवले आहे. या प्रसंगी संस्थेचे खजिनदार गुरलिंगप्पा कानडे, बाळासाहेब देशपांडे, जयराज पणुरे, किसन पतंगे, बी बी कोरे, मुख्याध्यापक डी व्ही खडके, माजी मुख्याध्यापक बी एम एळमेली, ए आर कोरे, शिवाजी माळी, सुरेश माळी, प्रा बसवराज म्हेत्रे, आर व्ही पाटील, एस एस धरणे, प्रा संदिप ढोबळे, निवृत्ती माळी आदींची उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील तर आभार एस एस धरणे यांनी यांनी मानले
 
Top