Views


  *सैन्यदलातील जवान आप्पाराव कांबळे यांच्या पार्थिवावर जेवळी येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आला*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

 अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झालेल्या भारतीय सैन्यदलातील जवान आप्पाराव मारुती कांबळे त्यांच्या पार्थिवावर लोहारा तालुक्यातील जेवळी येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलीस दलाकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेवळी येथील आप्पाराव मारुती कांबळे (वय 44) हे 26 वर्षापासून भारतीय स्थल सेनेत (13 महार रेजिमेंट) सुभेदार पदावर कार्यरत होते. सध्या ते थ्री महाराष्ट्र बटालियन एनसीसी कुलाबा मुंबई येथे सेवेत होते. गेल्या एक महिन्यापासून आजारी असल्याने पुणे येथील कमांड या सैनिकी रुग्णालयात उपचार चालू होता. परंतु रविवारी दि.11 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी दिडच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचे पार्थिवावर मंगळवारी दि.13 ऑक्टोबर 2020 रोजी मूळगावी जेवळी (ता लोहारा) येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाची अंतयात्रा फुलाने सजवलेल्या जीप मधून गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. याप्रसंगी भारत माता की जय, जवान आप्पासाहेब अमर रहे च्या घोषणांनी गाव दुमदुमून गेले.  त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता त्यांच्या शेतात शासकीय इतमा अंत्यसंस्कार करण्यात. येथील ग्रामपंचायततीकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. दरम्यान या याप्रसंगी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस विभाग, तेरा महार रेजिमेंट,  थ्री महाराष्ट्र बटालियन एनसीसी कुलाबा मुंबई, आजी- माजी सैनिक, विविध पक्ष व संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून बंदुकीच्या २७ राऊंड फैरी हवेत झाडून जवानांस मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांच्या मुलाकडून चित्यास भांडा अग्नी देण्यात आले. याप्रसंगी  नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, सुभेदार बाबुराव नवले, सुभेदार गिरिष गुप्ता, कॅप्टन डी डी वाघमारे, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाढोरे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरोबा कदम, सरपंच मोहन पणुरे, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, मंडळ अधिकारी एम एस स्वामी, पेशकार प्रवीण माटे, महादेव जाधव, ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार, बीट अंमलदार अशोक गिरी, हवालदार संजय कांबळे, अरविंद पटेल, प्रभाकर कांबळे, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिवंत साखरे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिन्नगुंड्डे, सतीश ढोबळे आदींची उपस्थिती होती.

 
Top