Views


*किसान युवा क्रांती संघटनेचे सोयाबीन, कापूस पिकाचे नुकसान भरपाई देऊन पिक कर्ज देण्याची मागणी*

अहमदनगर:-(प्रतिनिधी)

संगमनेर तालुक्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच सोयाबीन पिकाला जागीच कोंब फुटले आहे .आसमानी संकटाने संगमनेर तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे  कापूस, सोयाबीन पिकाचे परतीच्या पावसाने पूर्णपणे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची  आवश्यकता आहे. आज दिनांक14-10-2020 रोजी ठीक २ वाजता अमोल निकम यांना किसान युवा क्रांती संघटनेकडून सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले  व संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यातील तहसीलदारांना जागृत करण्यासाठी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन देण्यात आले.
निवेदन पत्रात असे की शेतकऱ्यांना विनाविलंबित पीक कर्ज वाटप बाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आदेश देऊन देखील बँक विविध अडचणी दाखवून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारून त्यांना अडचणी आणत आहेत. तरी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात संगमनेर तालुक्यातील सर्व बँकांना आदेश व्हावेत.

तसेच आपल्या परिसरातील बाजार समित्यांमध्ये बाजार समित्यांना बाहेर व्यापारी शेतकऱ्यांकडून केंद्रसरकारने ठरवून दिलेल्या एम एस पी  पेक्षा फारच कमी दराने मालाची खरेदी करत आहेत. याबाबत बाजार समिती व व्यापारी यांना आपले स्तरावरून एम एस पी नुसार शेतमाल खरेदीसाठी सप्त आदेश काढावे.
  त्याच प्रमाणे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान  झालेल्या पंचनामे काही भागात झालेली नाही. तरी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती.  विनंती अर्ज देतांना उपस्थित अक्षय देशमुख ( तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी संगमनेर)

किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, प्रा. यशवंत गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार साहेबाना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊन जागरूक करण्यात आले आहे.

 
Top