Views


*लोहारा तालुक्यात परतिच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट मदत जाहीर करावी -- भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यात परतिचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने सरसगट मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन  
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष व बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील व जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पटील यांनी लोहारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात परतीच्या पावसाने दि. 13 ऑक्टोंबर व दि. 14 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व मंडळात अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर वरील क्षेत्र बाधित झाले असून शेतकऱ्यांची सोयाबीन, ऊस, तूर, भुईमूग, कोथिंबीर, मका, तीळ, बाजरी, यासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे द्राक्षे, केळी, पपई, सिताफळ, आदि, फळबाग व ऊस भुईसपाट होऊन नुकसान झाले आहे. पूर्वीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी हा यंदा शेतात पीक जोमात आल्याने आपल्या खांद्यावरील कर्जाचे डोंगर कमी होईल, या आशेने आनंदित होता परंतु गेल्या महिन्यात व दि. 13 व दि. 14 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढून व झाकून ठेवलेले डिगारे अक्षरक्षः पाण्याच्या प्रवाहासोबत नदीमध्ये वाहून गेले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची अजून सोयाबीन व इतर पिके काढायची होती ते पिके हे भिजून वाहून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. व तसेच तालुक्यातील सर्व गावात पावसाच्या जबरदस्त तडाख्यात अनेकांच्या घरात पाणी घुसून घरातील संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घराच्या भिंती ढासळून जमीनदोस्त झाली आहेत. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत. तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील बांध बंधारे फुटले असून मोठ्या प्रमाणात संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. तरी महाविकास आघाडी सरकारने तात्काळ पंचनाम्याची अट रद्द करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करून थेट शेतकऱ्यांच्या व नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यावर जमा करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. भाजपा सरकारने गेल्या वर्षी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी पश्चिम महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी निकषां प्रमाणे अनुद्येय असलेल्या रकमेच्या दुप्पट अनुदान दिले होते, त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील महाविकास आघाडी सरकारने सरसकट अनुदान द्यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी लोहारा तालुक्याच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, पंं.स. सदस्य वामन डावरे, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, जि.का.सदस्य कमलाकर सिरसाट, विक्रम औटी, अदिंच्या सह्या आहेत.
 
Top