Views


*अतिवृष्टीमुळे पाणी घरात जाऊन नुकसान झालेल्या कुटुंबीयांना रा.स्व.संघ जनकल्याण समिती लोहारा यांच्यावतीने जीवनावश्क वस्तूच्या किट वाटप*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अतिवृष्टीमुळे लोहारा शहरातील महादेव मंदिर रस्त्याच्या बाजूला असलेल्या वस्तीमधील घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या कुटुंबातील व्यक्तींना जि.प. शाळेत रहावे लागले. सद्या पावसाचे पाणी ओसरल्याने ते परत घराकडे गेल्यास त्यांच्या घरातील अन्न धान्य सडून आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. संबधित नुकसानग्रस्त पाच कुटुंबांना रा.स्व.संघ जनकल्याण समिती लोहारा यांच्या माध्यमातून सामाजिक भावना जपत अन्न-धान्य व किराणा अशा जीवनावश्क वस्तूचे किट वाटप करण्यात आले. यावेळी जनकल्याण समितीचे प्रमुख शंकर जाधव, नगरसेवक श्रीनिवास माळी, शहाजी जाधव, विरभद्र स्वामी, आदी, उपस्थित होते.
 
Top