Views


*येत्या दोन दिवसात नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय जाहीर करू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी बुधवार(दि.21)रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान काटगाव ता.तुळजापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा. हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल. येत्या दोन दिवसात नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय जाहीर करू, शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभं करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी काटगाव येथील शेतकरी बांधवांना दिली.
यावेळी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील, रोजगार हमी मंत्री ना.संदीपान भुमरे, खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे-पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त श्री. सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक श्री. राजतिलक रोशन यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top