Views


*श्री तुळजाभवानी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा*
उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

(दि.23)शारदीय नवरात्र महोत्सवात  शुक्रवारी सातव्या दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. 
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार  अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते.  दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.  
उद्या (दि.24 रोजी) श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.

 
Top