Views


*एमपीएससी व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा निश्चित होईपर्यंत वयोमर्यादा वाढवा -- भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 
एमपीएससी आणि पोलीस भरतीच्या विद्याथ्र्यांची पुढील परीक्षा निश्चित होईपर्यंत वयोमर्यादा वाढावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे, कोरोना पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा सलग तिसज्यांदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु या दरम्यान एमपीएससी व पोलीस भरतीतील ज्या विद्याथ्र्यांची वयोमर्यादा संपणार आहे अशा विद्याथ्र्यांसाठी कोणतेही प्रयोजन राज्य सरकाने नियोजीत केलेले नाही. एकंदरीत परिस्थितीनुसर सरकाने निर्णय घेतला त्याबद्दल दुमत नाही. त्यामुळेच एमपीएससी व पोलीस भरतीची परिक्षा निश्चित होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी. सरकारच्या निर्णयामुळे कोणत्याही समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. भारतीय जनता युवा मोर्चा सर्व समाजातील विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. व त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही कटीबध्द आहोत. महाराष्ट्रातील वयोमर्यांदा संपलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे करियर संपुष्टात येणार आहे. या संदर्भात त्वरीत संबंधीत विभागांना आदेशीत करुन विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढविण्याची सुचना देण्यात यावी. अशी मागणी पत्रातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केली आहे. यावेळी ओम नाईकवाडी, सुजीत साळुंके, गिरीश पानसरे, सचिन लोंढे, श्रीकांत तेरकर, अॅङ कुलदिप भोसले, गणेश एडके, गणेश इंगळगी, दादुस गुंड, अक्षय भालेराव, निरंजन जगदाळे, अक्षय कांबळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top