Views




*कोविड --19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्ती, गतप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, अदिंचा श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट वज्ञभाजप महिला आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरातील श्री जगदंबा मंदिर येथे श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट व भाजप महिला आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने कोविड --19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्ती, गतप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, आदींचा दि. 22 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख म्हणून आ.राणाजगजितसिंह पाटील, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, जि.प.अर्थ व बांधकाम सभापती दत्ता देवळकर, जि.प.सदस्या शितल पाटील, नगराध्यक्षा ज्योती मुळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, माजी सरपंच नागणा वकील, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आरती गिरी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, आदि, उपस्थित होते. या कार्यक्रमास भाजपा माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, विठ्ठल वचने पाटील, दिपक मुळे, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, प्रमोद पोतदार, शंकर आप्पा मुळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद गिरी यांनी केले. व तसेच सतीश गिरी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जगदंबा मंदिर ट्रस्टचे उमाकांत लांडगे, रमेश जाधव, शिवराज झिंगाडे, प्रशांत माळवदकर, सतीश गिरी, गौरव गोसावी, प्रतिक गिरी, पिनू कदम, अंकुश बंडगर, आदींनी परिश्रम घेतले.

 
Top